शेतकरी नोंदणी
नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो,
कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्यामध्ये व आडते व्यापारी यांच्यात समन्वय साधत असते. शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी बाजार समितीने एक उपक्रम हाती घेतला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला योग्य व रास्त बाजारभाव मिळावा, यासाठी त्यांना बाजारपेठ, बाजारभाव व बाजार आवारातील दैनंदिन घडामोडी सातत्याने माहित होणे गरजेचे आहे. यासोबतच ही माहिती सतत त्यांच्यापर्यत पोहोचली पाहिजे. याचाच अर्थ शिवारातील शेतकरी शेतीक्षेत्रातील सर्व घडामोडी, अगदी शिवार-बाजार ते शासन स्तरावरील घडामोडी त्याला सतत माहित झाल्या पाहिजेत. या माहितीचा उपयोग करुन शेतकऱ्यांना आपले जीवन सुखी करणे शक्य होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.
आपण नोंदणी केल्यास आपणास कोथिंबीर व इतर नाशवंत पालेभाज्यांचे बाजार समितीतील अद्ययावत बाजारभाव माहिती होतील. त्यामुळे आपला काढणीचा आणि वाहतुकीचा खर्च याबाबतचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. परिणामी आपले संभाव्य नुकसान टाळता येऊ शकेल. त्याचबरोबर आपण बाजार समितीमध्ये माल टाकल्यास तो कोणत्या आडत्याकडे उतरविला आहे. तसेच मालाच्या बिलाची रक्कम किती झाली आहे त्याची माहिती मिळू शकेल. भविष्यात काही वादविवाद निर्माण झाले तर आपली ही नोंदणी अधिकृत गृहीत धरून आपणास सहकार्य करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांना शेतमालाचे दैनंदिन बाजारभाव, केंद्र व राज्य शासनाचे निर्णय व योजना, कृषी क्षेत्रातील घडामोडी आदी महत्वपूर्ण माहिती मोबाईलवर एसएमएस, ईमेल आणि इतर माध्यमांतून पोहोचविण्याचा बाजार समितीचा मानस आहे.
नोंदणीसाठी पोर्टलवर आपले नाव, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप मोबाईल नंबर, असल्यास ई मेल आयडी, पत्ता,आपण घेत असलेली पीके ही माहिती अचूक भरावी ही नम्र विनंती. यासाठी आपण नोंदणी करावी. तसेच आपल्या सहकाऱ्यांनाही यासाठी प्रेरीत करावे जेणेकरुन जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करून या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
अधिक माहितीसाठी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे
०२० - २४२६२३४९ या नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता.
धन्यवाद,
डॉ राजाराम धोंडकर
सचिव
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.